ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं जात पडताळणीच्या अर्जांचं प्रमाण वाढल्यानं ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे.

त्यामुळे आज आणि उद्या देखील राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत,असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.मुंडे यांच्या निर्देशानुसार ‘बार्टी’ मार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आल्यानं ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत अशी विनंती केली जात असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती १ जानेवारीपर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी, असे आदेश राज्यातल्या सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.