नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जपानची परदेशी प्रवाशांनवर बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे.

जपानी नागरिकांना देशात प्रवेश करण्यापूर्वी ‘कोविड निगेटिव्ह’ असल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य करण्यात आलं असून देशात प्रवेश केल्यानंतर पुन्हा कोविड चाचणीला सामोरं जायचं आहे. जपानमध्ये कोविड-19 चे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.