रायगड जिल्ह्यात पेण इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात पेण इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

हा आरोपी कुख्यात गुंड असून तो पॅरोलवर तुरूंगातून बाहेर आलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, पेण मधल्या सामाजिक संघटनांनी आज पेण बंदची हाक दिली होती.

राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून एडवोकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं ते म्हणाले. या प्रकरणातला आरोपी जामिनावर सुटला आहे .त्याच्यावर मोक्का लावण्याची शिफारस केली जाईल असंही त्यांनी सांगितलं