ओरोस रुग्णालयाच्या परिसरातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावं - मुख्यमंत्री


मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावानं असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावानं करण्याची प्रक्रिया सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावी, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागानं समन्वयानं तयार करून सादर करावा, असंही त्यांनी सांगितलं .