बेस्टच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी ९५ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : बेस्टच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी ९५ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये उपनगरी रेल्वे आणि इतर वाहने बंद असताना मुंबईकरांच्या मदतीला बेस्टबस धाऊन आली. या काळात अहोरात्र सेवा देत असताना अनेक कर्मचा-यांना कोरोनाचा बसलेला विळखा आता सैल झाला आहे. बेस्टमधल्या २ हजार ७५८ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ९५ टक्के कामगार कोरोनामुक्त झाले असून सध्या केवळ ४५ कामगारांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे..