देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोविड ४३ हजार ४९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातल्या एकूण रुग्णांची संख्या ८५ लाख २१ हजार ६१७ वर पोचली आहे. याबरोबरच देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९३ पूर्णांक ६९ टक्के झालं आहे.

देशात काल ४५ हजार २०९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली यामुळे, देशभरातल्या कोरोनाबोधितांची संख्या ९१ लाखाच्या उंबरठ्यावर पोचली आहे. आत्तापर्यंत देशभरातल्या एकूण ९० लाख ९५ हजार ८०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशभरात काल ५०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३३ हजार २२७ झाली आहे. सध्या देशभरात ४ लाख ४० हजार ९६२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिली.