पुणे:- जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनीक मोफत धर्मदाय दवाखाना यांनी संयुक्तपणे दिवाळी पाडवा , बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणानिमित्ताने विद्यानगर प्रभागातील जेष्ठ नागरिक महिलांना जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे सल्लागार आणि माजी नगरसेवक मा. प्रकाशशेठ धरमशी बाबर यांच्या हस्ते साडी आणि भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला.
कोरोना संसर्ग परस्थिती ,महामारी आजारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेलेले असल्याने यावेळीची दिवाळी याभागातील नागरिक दिवाळीसण साजरा करू शकणार नाहीत ही जाणीव लक्षात ठेवून त्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
विद्यानगर प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री अग्रसेन क्लिनिक , मोफत धर्मदाय दवाखाना आणि जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे वतीने मोफत रक्त , लघवी तपासणी करून तसेच अनुभवी वैद्यकीय डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. रोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात 40 ते 50 रूग्ण नागरिक उपचार घेत आहेत. मोफत रक्त , लघवी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. सदरचा उपक्रम , आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, मा. देविचंद किशनलाल अग्रवाल - अध्यक्ष - डाॅ. संतोष अग्रवाल , डाॅ. शितल कुंभार ( ढवळे ) , डाॅ. निलोफर सिकिलकर , डाॅ. रमेश बन्सल , मा. प्रकाशशेठ बाबर सल्लागार / माजी नगरसेवक , श्री शहाबुद्दीन शेख , अध्यक्ष - जेष्ठ नागरिक संघ , शिवाजी माने - उपाध्यक्ष , श्रीशैल जिडगे -खजिनदार , श्री जयवंत थिटे - सचिव तसेच संघाचे पदाधिकारी , सभासदाचे सहकार्य लाभले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.