देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावरनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८१ लाख १५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.


काल ४४ हजार ८७४ नवे रुग्ण आढळले, तर ५४७ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एक लाख ८८ हजार ६६८ रुग्णांचा, या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला असून, मृत्यूदर १ पूर्णांक ४७ शतांश टक्के इतका आहे. देशात सध्या ४ लाख ८४ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल एका दिवसात ११ लाख ३९ हजार कोविड चाचण्या झाल्या. देशभरात आतापर्यंत १२ कोटी ३१ लाख चाचण्या केल्या असल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. 


मोठ्या संख्येनं चाचण्या करणं हे कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये सर्वात प्रभावी ठरल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्विट संदेशात म्हटलं आहे.