देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमीनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली. सध्या देशात 5 लाख 9 हजार सहाशे 73 रुग्णांवर उपचार सुरु असून 79 लाख 17 हजार तीनशे 73 रुग्ण त्यातून आत्तापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 56 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.काल सलग दुसऱ्या दिवशी नव्यानं आढळणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी राहिली. कोविड-19 जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत असलेल्या व्यापक जन आंदोलनामुळे ही घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज


सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देशात गेल्या 24 तासात 46 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.


त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 85 लाख 53 हजार सहाशे 57 वर गेली आहे. गेल्या 24 तासात 48 हजार चारशे पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 79 लाख 17 हजार तीनशे 73 झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 8 लाख 35 हजार चारशे एक कोविड तपासणी चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आरनं दिली आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image