बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ आज काळ्या फिती बांधून काम करत आहे.


  बेळगाव, कारवार, निपाणीसह 'संयुक्त महाराष्ट्र' हा आपला निर्धार असून सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.


  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं. राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

  अजूनही कर्नाटक सरकार कडून सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर अन्याय होत असून, त्याच्या निषेध म्हणून हाताला काळी फीत लावल्याचं पाटील यांनी सांगितलं.


Popular posts
राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
राज्यातल्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या ५ जागांसाठी १६८ उमेदवार निवडणूक रिंगणात
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद