मुंबई महापालिका क्षेत्रात फटाके तसंच आतषबाजीवर बंदी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नियंत्रित स्वरुपात दिवाळी साजरी करताना शक्यतो एकमेकांच्या घरी जाणं टाळावं, तसंच फटाक्यांच्या धुराचा 'कोविड -१९' बाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात येत आहे, असं मुंबई महापालिकेच्या पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, त्यामुळे दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही. हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह तसंच त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. नियमभंग करणाऱयांवर महानगरपालिका आणि पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.