'बेस्ट' कर्मचाऱ्यांसाठी १० हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान - किशोरी पेडणेकर


मुंबई (वृत्तसंस्था) : 'बेस्ट' अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १० हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले आहे. याबाबत किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल संध्याकाळी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती.

कोरोना काळात 'बेस्ट' 'मधील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना ने-आण करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित गटनेत्यांच्या बैठकीला उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते श्री. रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेते श्रीमती राखी जाधव, सुधार समिती अध्यक्ष श्री. सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा  श्रीमती संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष श्री. प्रवीण शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलारासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, बेस्ट व्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. सुहास सामंत, कार्याध्यक्ष अँड. उदय आमोणकर, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष भूपेंद्र नांदोसकर, भास्कर तोरसकर, गणेश शिंदे हे उपस्थित होते.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image