कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचे शरद पवार यांचे आश्वासन


मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याचे आयात-निर्यात धोरण हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे सध्या उद्भवलेल्या कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिले आहे. ते आज नाशिक इथं कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांशी बोलत होते. 


कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ, असे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या किती समस्या असल्या तरी लिलाव व्यवहार बंद ठेवू नयेत, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.


शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचे धोरण सुस्पष्ट असले पाहिजे, असे पवार म्हणाले. राज्यात ज्यादा दराने कांदा बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची राज्य सरकार निश्चित दखल घेईल आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करेल असेही त्यांनी सांगितले. 


आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पवार यांनी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार हेमंत टकले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image