राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपालांकडून अभिष्टचिंतन


मुंबई : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे पत्राद्वारे अभिष्टचिंतन केले आहे.


महाराष्ट्र शासन तसेच राज्यातील जनतेच्या वतीने आपल्या वाढदिवसानिमित्त आपले अभिष्टचिंतन करतो. आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो व आपणाकडून राष्ट्रसेवा निरंतर घडो ही मंगल कामना करतो’, असे राज्यपाल कोश्यारी यांनी  आपल्या शुभेच्छा पत्रामध्ये म्हटले आहे.