ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन


मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज  ठाण्यात रहात्या घरी, ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांना रूग्णालयातही दाखल केलं होतं. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

१९७८ मध्ये बंदिवान मी या संसारी चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. जसा बाप तशी पोरं, आधार, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, माफीचा साक्षीदार, लपवाछपवी अशा तब्बल ८० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

तर त्यांची वासूची सासू, सौजन्याची ऐशी तैशी, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडासदन ही नाटकं प्रचंड गाजली होती. दामिनी या मालिकेतही त्यांनी भूमिका केली होती. त्यांनी अनेक स्टँड अप कार्यक्रमांची निर्मितीही केली होती. 


Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image