योजनांच्या माहिती व जनजागृतीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार


मुंबई : दिव्यांग व्यक्तींमध्ये  समाज कल्याण विभागाच्या योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.


दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता शरद चव्हाण, उपायुक्त- नागरी हक्क संरक्षण, सुरेंद्र पवार,उपायुक्त- जात प्रमाणपत्र पडताळणी, विजय गायकवाड, सहाय्यक आयुक्त – शासकीय वसतिगृह व अनुदानित वसतिगृह, योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त – रमाई आवास योजना यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/qdXf2wNzxQg या लिंकचा वापर करावा.


दुपारी 3.00 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती  देण्याकरिता बी जी अरावत सहाय्यक आयुक्त – मिनी ट्रॅक्टर व दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना राधाकिसन देवडे सहाय्यक आयुक्त- जिल्हा परिषद सेस फंड उमेश शहागडकर समाज कल्याण निरीक्षक – भारत सरकार शिष्यवृत्ती परदेश व परराज्य शिष्यवृत्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरच्या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/jHRC1uh0p2M या लिंकचा वापर करावा.


तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्या यु ट्यूब चॅनलला भेट द्यावी.