जिल्हा निहाय कोरोना अपडेट

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात काल १३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविडच्या रूग्णांची एकूण संख्या आता ३९ हजार ३४१ वर पोहचली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या २५ हजार ४३६  इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या १३ हजार ९०५ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.   रायगड जिल्ह्यात काल कोविडमुक्त झालेल्यांची संख्या ही लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येपेक्षा जवळपास दुप्पट होती. काल ३४५ रूग्ण बरे झाले तर १४३ नव्या रूग्णांची नोंद झाली. काल एकाच दिवसात ६ जण कोविडनं मरण पावले. 


  रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचा संसर्ग कमी होत आहे. कोविडचे काल केवळ १८ नवीन रूग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८ हजार २३१ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला, विविध रूग्णालयांमध्ये २५७ जणांवर उपचार सुरू आहेत. तर काल ३४ जणांना कोविडमधून बरे झाल्यानं सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातल्या कोरोना मुक्तीचा दर ९२ दशांश ०१ टक्के इतका आहे. तर एकाचा गेल्या चोविस तासांत मृत्यू झाला.


  जालना जिल्ह्यात काल ४ जणांचा कोविडनं मृत्यू झाल्यानं जिल्ह्मातल्या एकूण मृतांची संख्या २६१ झाली आहे. काल दिवसभरात कोविडचे २७ नवे रूग्ण आढळले. काल एकाच दिवसात १०१ जणांना बरे झाल्यानं रूग्णालयातनं घरी पाठवण्यात आलं. सध्या जालना जिल्ह्यात १ हजार ८०२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 


  जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात १५२ नवीन रूग्ण आढळले. तर कालच १६९ रूग्ण बरे होऊन घरी परतले. काल तिघांचा कोविडनं मृत्यु झाला. एकूण रूग्णांची संख्या जिल्ह्यात ५२ हजार ४१ आहे. तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ४८ हजार ९३५ आहे. 


  सांगली जिल्ह्यात काल एकाच दिवसात कोविडचे २१५ रूग्ण आढळले. तर चौघांचा कोविडनं मृत्यू झाला. २ हजार ५९१ जणांवर उपचार सुरू आहेत. तर काल अखेरपर्यंत जिल्ह्यात ३८ हजार ९०२ रूग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. १ हजार ५८० जणांचा कोविडनं जिल्ह्यात बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला ४३ हजार ७३ रूग्ण पॉझिटिव्ह आहेत. 


  सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात चाचणी अहवालात २०९ जणांना कोविडची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ४३ हजार ८६५ इतकी झाली. तर काल दिवसभरात ७२६ जण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. यामुळे सातारा जिल्ह्यात कोविडमुक्त झालेल्यांची संख्या आता ३७ हजार ३०८ इतकी आहे. तर १ हजार ४३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 


  लातूर जिल्ह्यात काल ४६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. सध्या जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंची संख्या ३०० आहे. वाशिम जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण २० नव्या कोविड रूग्णांची नोंद झाली आहे. तर ४६ जणांना ते बरे झाल्यानं डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. काल एका मृत्युचीही नोंद वाशिममध्ये झाली. सध्या ६७६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण ११७ जण बळी गेले आहेत. 


  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ६८९ झाली आहे. यापैकी ३३ हजार ७८२ रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण एक हजार ३६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला असून, सध्या एक हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.