देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे. लस परिक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.


१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ हजाराहून अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार असून, दहा राज्यातल्या १८ ठिकाणी हे परिक्षण होईल. मुंबईचाही त्यात समावेश आहे.


कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेडद्वारा तयार होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परिक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे.