महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट


पिंपरी : ब्रिटिशकालीन गाव पातीळीवरील काम करणारे महसूल विभागातील कोतवाल हे पद आजही उपेक्षितच, कोरोना सारख्या लढाईत ना विमा ना भत्ता तरीही आपली सेवा बजावत आहेत. तहसिल स्तरावरील नैसर्गिक आपत्ती, रात्र पाळी, निवडणूकीची कामे, लिपीप वर्गीय कामे, तलाठी सोबत पंचनामा, शासकीय पंच, गौण खनिज शासकीय, शेतीविषयक वसुली, अकृषिक वसूली अशी अनेक कामे शासनाच्या पुर्ण पगारदार कर्मचाऱ्यासोबत पार पाडतो. पण, आजही तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहोत.


कोतवाल बंधु आणि भगिंनिनी अनेक वेळा अन्नत्याग, आंदोलन, पायी मोर्चा, बेमुदत कामबंद आंदोलन केली. संपुर्ण महाराष्ट्र भर तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयालसमोर मागील 2019 वर्षी आंदोलन केली होती. कोतवालांना चतुर्थ श्रेणीची मागणी वारंवार शासनाकडे केली. परंतु, नेहमीच आश्वासने मिळाली.


2019 ला जे मानधन होते 5010/-रू. त्यात 2500/- रू. तुटपुंजी वाढ झाली. त्यातून या महागाईच्या काळात कुटुंबसहित जगणेही कठीण आहे आणि अनेक अटी व 50 वर्षे वय असलेल्या कोतवालांना 15,000/- रु. मानधन केले. कोतवाल हा सर्व समान काम करतो. तसेच शासनाच्या या निर्णयामुळे वय वर्षे 50 या कोतवालांना 15,000/- रु. मानधन व इतर कोतवालांना 7510/- रु. मानधन या शासनाच्या निर्णयामुळे कोतवालांनामध्ये शासनाने दुजाभाव केला. कोतवालांनामध्ये दुफळी निर्माण झाली.


"समान काम समान मानधन" मिळावे, अशी अपेक्षा महाराष्ट्रतील सर्व कोतवालांची आहे. तरी सरकारने कोतवालांच्या या मागणीचा गांभिर्याने विचार करावा. समान 15,000/-रु. मानधन करून कोतवालांच्या आयुष्यात चांगले दिवस आणावेत आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल. अशी मागणी महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेचे आहे.


संपूर्ण महाराष्ट्रतील कोतवाल खुप आशेने सरकारकडून 15,000/- रु. मानधन होईल, या शासन निर्णयची वाट पाहत आहे. "समान काम समान मानधन" करावे अशी आर्त हाक कोतवाल करत आहेत. नाही झाल्यास दिवाळीनंतर पुणे ते मुंबई पायी मोर्चा काढण्याच्या तयारीत कोतवाल संघटना आहे. अशी माहिती महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट यांनी पत्रकारांना दिली.