साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन


मुंबई : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism policy) मसुदा पर्यटन  संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. धोरणाचा मसुदा संचालनालयाच्या  www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in व asdtourism.est-mh@gov.in या ईमेल आयडीवर दि.07 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


साहसी उपक्रम धोरण महाराष्ट्रात कोकण किनारा, पश्चिम घाटातील पर्वतराजी, विदर्भ या वैविध्यपूर्ण प्रदेशात पाणी, जमीन व हवेतील साहसी पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. साहसी पर्यटन हे क्षेत्र पर्यटनाचे लोकप्रिय अंग असून पर्यटकांचा साहसी पर्यटनाकडे कल वाढत आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत साहसी पर्यटनाला चालना देणे तसेच साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था, अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स, साहसी क्रीडा संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, संघटना, क्लब यांची नोंदणी, विनियमन, सनियंत्रण, नियोजन, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश करुन साहसी उपक्रम धोरण तयार करण्यात आले आहे.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image