अहमदनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या गोपाळवाडी-चेडगाव तालुका राहुरी इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना जाहीर झाला आहे.

सलग तिसऱ्यांदा अहमदनगर जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.

गोपाळवाडी या शाळेत बहुतांश विद्यार्थी भटक्या जमातीचे आहेत. त्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबवले आहेत. नवी दिल्लीच्या NCERT च्या पथकान या शाळेवर येऊन यापूर्वी मंगलाराम यांच्या उपक्रमाची दखल घेतली.

आर्ट इंटेग्रॅटेड लर्निंग या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाटयीकरण, बाहुली नाट्य यासारखे प्रयोग केले. मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर्स च्या माध्यमातून जगातल्या 25 देशांमधल्या शिक्षकांच्या संपर्कातून जगाची व्हर्चुअल सहल विद्यार्थ्यांना घडवून आणली.

केलेल्या कामाचं कौतुक या पुरस्कारानं केले असल्याची भावना, नारायण मंगलाराम यांनी व्यक्त केली. उद्या शिक्षक देणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्यांना हा पुरस्कार प्रदान करतील.