अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारांत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा केनेडिअन जोडीदार डेनिस शेपोवलोव यांनी जर्मन प्रतिस्पर्ध्यांना नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

भारताच्या सुमित नागल आणि दिविज शरण हे या स्पर्धेतून बाहेर गेल्यानं रोहन बोपन्ना हा एकमेव भारतीय खेळाडू आपली लढत देत आहे. महिला एकेरी गटांत सेरेना विलिअम्सनं पुनरागमन केलं आहे.