खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत वचनबद्ध - केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत सदैव वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. जागतिक डोपिंग विरोधी संस्था 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या चर्चेत ते बोलत होते. 


वाडाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा तयार झाली आहे. त्याला गेल्या ऑगस्ट पासून स्थगिती दिली आहे, त्यासाठी वाडाच्या पथकानं येऊन पाहणी करावी आणि या प्रयोगशाळेला लवकर मान्यता द्यावी, अशीही मागणी त्यानी या दरम्यान केली आहे.