राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राऊत यांनी स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली.

कोविड-19 चा संसंर्ग होणारे राऊत हे राज्यमंत्रीमंडळातले नववे सदस्य असून याआधी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, अस्लम शेख, अब्दुल सत्तार आणि विश्वजीत कदम या मंत्र्यांना कोविड-19 संसंर्ग झाला आहे.