युएई येथे होणाऱ्या तेराव्या आयपीएल क्रीडा स्पर्धाच्या वेळपत्रक जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युएई येथे येत्या 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या  IPL क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आज BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं. स्पर्धेच्या प्रथेनुसार सलामीचा सामना मागील स्पर्धेतला विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. 


COVID-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा हे सामने भारतात होणार नसून, ते दुबई, अबुधाबी आणि शारजा या संयुक्त अरब अमिरातीतल्या तीन शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. 


सलामीच्या सामन्यानंतर पुढील दिवशी दुबईमध्ये दिल्ली कपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांमध्ये स्पर्धेचा पहिला सामना होईल, तर त्यानंतर तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होईल.