राज्यातील ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यात ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ हजार ४०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातले ५ हजार १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या १ हजार २१३ जणांमध्ये १५० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबईत सर्वाधिक ४८ पोलिस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्यात ३ अधिकारी आहेत. कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून पोलिसांवरील हल्ल्याची ३१३ प्रकरणं नोंदवण्यात आली तर ५४ आरोग्य कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. या प्रकरणी ८८९ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी कलम १८८ उल्लंघन प्रकरणी १ लाख ७७ हजार ४९१ गुन्हे नोंदवले असून या काळात ९१ हजार ८०५ वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये १३ कोटी ४० लाख रूपयांचा दंडही वसुल केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.