मुंबई : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .
केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.