लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांनाचं कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुण्यात निष्पनं

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच लसीकरण झालेलं असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेने केलेल्या विश्लेषणातून समोर आला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा अद्यापही न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना बाधित होण्याचं प्रमाण तुलनेत कमी असून संसर्ग झालेल्यांपैकी बहुतांश जण गृहविलगीकरणात राहूनच बरे झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी काल ही माहिती दिली. 


Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image