सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधल्या ट्यूरिन इथं सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून या स्पर्धेचं  विजेतेपद पटकावलं आहे. २०१५  नंतर या स्पर्धेतलं  जोकोविचचं  हे पहिलं  विजेतेपद होतं.  त्यासोबत त्यानं  रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३५ वर्षीय जोकोविच हा जेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.