देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डीजीटल रुपी चलनाच्या वापरला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.

या ई -रुपीचा वापर आंतर बँक व्यवहाराची कार्यक्षमता वाढवेल, तसंच यामध्ये प्रत्यक्ष रकमेची देवाण घेवाण होणार  नाही. त्यामुळे  व्यवहाराचा एकूण खर्च कमी होईल असं यात म्हटलं आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा , युनिअन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI  बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक, IDFC First Bank आणि  HSBC बँक या बँका निर्धारित करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.   

घाऊक  क्षेत्रात डिजिटल रुपी चलनाच्या  वापरमधून  मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्य घाऊक व्यवहार आणि आंतर-देशीय  व्यवहारांसाठी  डिजिटल  रुपी चलन प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यावर भर दिला जाईल. तसंच येत्या महिन्याभरात सर्वसामान्य नागरिकांसाठी  देखील डीजीएल रुपी चलन खुलं करण्याची  रिझर्व्ह बँकेची योजना आहे. यासाठी निवडक क्षेत्रात ग्राहक आणि विक्रेत्यांच्या परस्पर व्यवहारासाठी  डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा  वापर केला जाईल,  असं या निवेदनात  म्हटलं आहे.