देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समिती तयार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राष्ट्रीय सहकार्य नीती’ आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी एक समिती तयार केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय संमेलनाला ते संबोधित करत होते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या समितीचे अध्यक्ष असतील आणि या समितीमध्ये प्रत्येक राज्याचा प्रतिनिधी असेल  असंही त्यांनी यावेळी सांगितलं.