महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती गंभीर होत चालली आहे. दोलेश्वरममध्ये सर आर्थर कॉटन बैराज इथून १५ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्त्ती प्रतिबंधक डाळ तसंच, राज्य आपत्ती प्रतिबंधक दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. भावित जिल्ह्यात के जिलाधिकारी स्थिति आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाय करत आहेत. तेलंगण राज्यात उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. निर्मल, निजामाबाद, करीमनगर, पेद्दापल्ली आणि आसिफाबादमध्ये सलग ६ दिवस पाऊस कोसळत आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊसामुळे १० जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत १० हजार नागरिकांना बचाव शिबिरात ठेवण्यात आलं आहे. हवामान विभागान मंचेरियल, राजन्ना सिरसिला, करीमनगर तसंच पेद्दापल्लीसह १० जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वळवली असून रेड अलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव यांनी जीवित तसंच वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.