शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. जालना इथं आज ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. विशिष्ट परिस्थितीमुळे नाईलाज झाल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असून तसं आपण शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनाही कळवलं आहे असं खोतकर म्हणाले.

शिवसेनेतल्या फुटीनंतर खोतकर काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता होती. दिल्लीहून परतल्यावर आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करु असं खोतकर यांनी सांगितलं होतं.