अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे अग्निपथ योजनेचा लाखो लोकांना लाभ मिळेल, असं गृह मंत्री अमित शाह यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. अग्निपथ योजनेतून प्रशिक्षित युवकांना देशाची सेवा आणि सुरक्षा करण्यात मोठा योगदान देता येईल असं शाह म्हणाले. या योजनेवर सविस्तर नियोजनाचं काम सुरु झालं आहे, असं ते म्हणाले.