रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे - अशोक सराफ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : 'रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. ७५ वा वाढदिवस आणि कारकिर्दीचं सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं दादरच्या श्री शिवाजी मंदिरात काल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

अशोक सराफ यांच्या 'व्हॅक्यूम क्लीनर' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान 'अष्टविनायक' नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे अशोक सराफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन प्रेक्षकांच्या वतीनं पत्रकार शीतल करदेकर यांनी केलं. यावेळी अशोक सराफ यांच्या परिवारासह लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.