जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दुहेरी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यापैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जुनैद आणि बासित भट अशी आहेत. ते हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. गेल्या वर्षी अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येत बासितचा हात होता. दरम्यान, सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील लिटर भागातील अरमुल्ला गावात पेरलेली १५ किलो स्फोटकं जप्त केली असून या प्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.