पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आढावा बैठक पार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहरात मूलभूत सोयी - सुविधांच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्या आणि अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत पंढरपूर इथं आढावा बैठक पार पडली. भाविकांच्या आरोग्य दृष्टीनं औषध - गोळ्या यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणं, स्वच्छतेच्या अनुषंगानं सार्वजनिक शौचालयांचं प्रमाण वाढविणं, येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं, अशा प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.