कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करून रोवला मानाचा तुरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. आज पहाटे ६ वाजता तिने या जगातल्या सर्वात उंच आणि अवघड हिमशिखरावर आपला झेंडा रोवला. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्यावर्षी एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेत शेवटच्या टप्प्यात खराब वातावरणामुळे तिला मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. यापूर्वी अन्नपूर्णा शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक - होण्याचा मान कस्तुरीने मिळवला आहे.