राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा आरोप केला आहे. ते मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. 

राज्यशासन पेट्रोलवर प्रति लिटर 30 रुपये अबकारी शुल्क आकारत आहे, तर केंद्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 19 रुपये आकारतं म्हणजेच इंधनाच्या दरवाढीला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला.