नाशिक जिल्ह्यातील ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

 


मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते झाला. सुमारे २५ कोटी २७ लाख रुपये खर्चाची ही योजना असून यामुळे दिंडोरी तालुक्यातल्या दुर्गम गावातल्या नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. जल जीवन मिशनचं काम केंद्र आणि राज्य शासनाने मिळून करायचं आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त लक्ष घालून चांगल्या दर्जाची कामं पूर्ण करावीत असे आदेश भारती पवार यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला कृषी, पाणीपुरवठा आणि आरोग्य खात्याचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.