मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्र उभारणीतील ग्राम विकासाचे महत्त्व सहज सोप्या पद्धतीने समजावून दिले. समाजातील वाईट प्रथा, चालीरितीना त्यांनी कठोर शब्दांत विरोध केला. तुकडोजी महाराज यांचे ग्राम कल्याणाचे विचार प्रत्यक्षात यावेत यासाठी प्रयत्नशील राहूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.