रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका, युरोप आणि इंग्लंड यांनी रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध लावले आहेत. हे प्रतिबंध युक्रेन येथे लष्करी कारवाई करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, रशियामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. रशियाच्या तेलाची विक्री आता अमेरिकेच्या बंदरांवर होणार नाही तसंच अमेरिकेची जनता रशियाचे राष्ट्रपती ब्ला दिमिर पुतिन यांना आणखी एक आर्थिक धक्का देतील. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान होणार आहे. अमेरिकेने हे मान्य केलं आहे की रशियाकडून तेल आयातीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकेतील तेलांच्या किमतीत वाढ होईल. बायडेन पुढे म्हणाले कि हा निर्णय  युरोपीय देशांच्या सहकारितेद्वारे चर्चा करून घेण्यात आला आहे. याआधी युरोपीय संघाने म्हंटलं होतं की रशियाकडून घेण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या आयातीत दोन तृतीयांश टक्के कमतरता येईल. २७ देशांच्या युरोपीय संघाच्या वायू गरजेच्या ४० टक्के मागणीची पूर्तता रशियाद्वारे करण्यात येत असे. युरोपीय संघाने म्हंटले की त्यांच्या नैसर्गिक वायूच्या गरजा इतर पर्यायांद्वारे ते शोधून काढणार असून शीघ्र गतीने ऊर्जास्रोतांचा विस्तार करतील. अशाप्रकारे २०३० पर्यंत रशियावरील जीवाश्म इंधनावरील अवलंबिता  संपुष्टात येईल. युरोपीय संघाच्या नेत्यांची २ दिवसीय बैठक बुधवारी पॅरिसच्या वर्सेलिस इथं होणार असून या बैठकीत जीवाश्म इंधनाची निर्भरता कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा होईल .

Popular posts
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Image
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image