देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतका आहे. देशात गेल्या २४ तासात २ हजार ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातल्या बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४ कोटी २४ लाख ८० हजार ४३६ झाली आहे. तर काल १ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या १६ हजार ७४१ सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७८ कोटी ६३ लाख चाचण्या झाल्या असून गेल्या २४ तासात ६ लाख ५८ हजाराहून जास्त चाचण्या झाल्याची नोंद आहे.