भाजपा भ्रष्टाचारी पक्ष आहे : नाना पटोले

 

नाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅली

पिंपरी : भाजपा हा भ्रष्टाचारीच पक्ष आहे. भाजपाच्या नेत्यांनी खोटं बोलून देशात सत्ता मिळवली. आज देश विकण्याचं काम भाजपाचे दिल्लीतील आका करीत आहेत. त्यांची मानसिकता काय आहे हे भारतातील नागरीकांनी ओळखले आहे अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

शनिवारी (दि. ५ फेब्रुवारी) नाना पटोले यांनी रावेत ते दापोडी अशी भव्य परिवर्तन दुचाकी रॅली काढली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, विश्वास गजरमल, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले तसेच अशोक मोरे, विश्वनाथ जगताप, दिनकर भालेकर, माऊली मलशेट्टी, किरण नढे, संजिव झोपे, शाकीब खान, डॉ. वसिम इनामदार, कौस्तुब नवले, निखिल भोईर, झेवियर ॲन्थोनी, ॲड. उमेश खंदारे, हिरा जाधव, आबा खराडे, प्रा. किरण खाजेकर, इस्माइल संगम, तारीक अख्तर, स्वाती शिंदे, रोहित भाट, सौरभ शिंदे, रोहित तिकोणे, विजय ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, स्वप्निल बनसोडे, रवि नांगरे, अशोक धोत्रे, मधुकर पाटील, बाळासाहेब पवार, रमेश हरिभक्त, विजय चौगुले आदी उपस्थित होते.

किवळे - मामुर्डी - रावेत - वाल्हेकर वाडी - चापेकर चौक - चिंचवड स्टेशन - मोरवाडी चौक - अजमेरा कॉलनी - नेहरुनगर - संत तुकाराम नगर - वल्लभनगर - नाशिक फाटा - कासारवाडी - फुगेवाडी - दापोडी रॅलीच्या या मार्गावर ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. अजमेरा कॉलनी येथे बीएसपीचे शहराध्यक्ष सुरेश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रिती गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

चिंचवड गावातील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांना सर्व उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी नाना पटोले माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले की, कॉंग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आहे. त्यांच्या पाठिंब्याने पिंपरी आणि पुण्यामध्ये सत्ता आणण्याचे स्वर्गवासी प्रा. रामकृष्ण मोरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापुर्वी पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाकण्यासाठी नागरीक कॉंग्रेसला आशिर्वाद देतील आणि पिंपरी चिंचवड व पुण्यामध्ये कॉंग्रेसची स्वबळावर पुन्हा सत्ता येईल असा आशावाद नाना पटोले यांनी व्यक्त केला.


Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image