संपामुळं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा विचाराधीनही नाही अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवु नये आणि संपकरी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं.