कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ४४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे १७२ कोटी १८ लाख झाली आहे. त्यात ७४ कोटी ९२ लाख नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ६० लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ६ कोटी ४९ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ३ लाख ९१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १५ कोटी १७ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ६ कोटी ३६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १२ लाख ७४ हजार पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image