कॉनबॅकच्या स्फूर्ती समूहाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं उभारण्यात आलेल्या कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर अर्थात कॉनबॅकच्या स्फूर्ती समूहाचं उद्घाटन केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केलं. या समूहाच्या विकासासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयानं 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी दिला असून यातून 300 कारागिरांना मदत केली जाणार आहे. यावेळी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, कोनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.