मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केलं. राज्यपालांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. २००५ साली मिठी नदीला आलेल्या पुरानंतर पालिकेनं मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या कामाची विस्तृत माहिती चहल यांनी यावेळी राज्यपालांना दिली. नदीतला गाळ उपसण्याच आतापर्यंत झालेले काम, संरक्षक भिंतीच्या बांधकामाची स्थिती, तसेच नदीच्या रुंदीकरणाची आणि खोलीकरणाची माहिती त्यांनी दिली. सन २००६च्या तुलनेत आज मिठी नदीची परिवहन क्षमता ३ पटींनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं.मिठी नदीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिका करत असलेल्या कामाची माहितीही त्यांनी राज्यपालांना माहिती दिली.