74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रीय युध्दस्मारक इथं कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करून आज आयोजित करण्यात आला होता. देशाच्या पश्चिम सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या दक्षिण कमांडनं स्वातंत्र्यानंतर सर्व मोठ्या लष्करी कारवायांमध्ये भाग घेतला आहे आणि नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्तींच्या वेळी नागरिकांना मदत केली आहे. ७४ व्या लष्कर दिनानिमित्त, दक्षिण कमांडच्या अधिकारी आणि सैनिकांनी भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा जपण्याची आणि राष्ट्राची अखंडता आणि सुरक्षितता जपण्याची शपथ घेतली. दक्षिण कमांड प्रमुखांनी या शुभ प्रसंगी सर्व पदांवरील अधिकारी, शूर जवान, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या तसंच दक्षिण कमांडच्या सर्व अधिकारी आणि जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून मातृभूमीचे रक्षण करण्याच्या कार्यात स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन