डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित या अभिवादन कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.